महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊन: कृषी उत्पन्न बाजार समिती बंद.... शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नंदुरबार येथील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये दोन्ही राज्यातून व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येतात. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची विक्री होऊन दररोज लाखोंची उलाढाल होते. मात्र, संचारबंदी असल्यामुळे मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे.

By

Published : Apr 8, 2020, 10:13 AM IST

vegetable-market-closed-due-to-corona-virus-in-nandurbar
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद...

नंदुरबार- नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटला महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील सर्वात मोठी भाजीपाला बाजारपेठ म्हणून ओळख आहे. या बाजार समितीत राज्यातील सीमावर्ती भागातील जवळपास तीन ते पाच हजार शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे व्यापारी येत नसल्याने बाजार समितीतील कामकाज ठप्प झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद...

हेही वाचा-न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार येथील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये दोन्ही राज्यातून व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येतात. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची विक्री होऊन दररोज लाखोंची उलाढाल होते. मात्र, संचारबंदी असल्यामुळे मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे.

त्यातच नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 37 अंशापर्यंत गेल्याने भाजीपाला उन्हाने खराब होत आहे. एकूणच नंदुरबारमध्ये बाजार समिती बंद असल्याने शेतकरी आणि ग्राहकांना याचा फटका बसत असताना, गुजरातमधील सुरत आणि बडोदा मध्येही भाजीपाल्याची टंचाई जाणवत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details