नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होणारा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पपई पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे फळे खराब होत आहेत. तर अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पपई बागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच योग्य दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता.
अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पपई बागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच योग्य दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता.
अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका
पपईसाठी दुष्काळात तेरावा महिना
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याबरोबर तयार झालेला माल कमी दरात विकावा लागला होता. यंदा गेल्या वर्षाची भर निघून येईल असा अंदाज सूत्रांनी वर्तवला होता. मात्र तयार झालेल्या पपई पिकावर यंदा दुसऱ्यांना अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत झाली आहे.
हेही वाचा -बीएमसीची कारवाई, सोनू सूद पवारांच्या दारी