महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवण नदीच्या पुरात दोघे अडकले; नागरिकांच्या मदतीने बचावले - nandurbar police

नंदुरबार शहराजवळ असलेल्या शिवण नदीवर गाडी धुण्यासाठी गेलेले दोघे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने दोघांनी जुन्या पुलाच्या खांबांचा आधार घेतला. मात्र या ठिकणी ते दोघेही दीड तास अडकून पडले होते. अखेर प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

rivers in nandurbar
शिवण नदीच्या पुरात दोघे अडकले; नागरिकांच्या सहाय्याने बचावले

By

Published : Sep 10, 2020, 12:44 PM IST

नंदुरबार -मुख्य शहराजवळ असलेल्या शिवण नदीवर गाडी धुण्यासाठी गेलेले दोघे जण पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने दोघांनी जुन्या पुलाच्या खांबांचा आधार घेतला. या ठिकाणी ते दोघेही दीड तास अडकून पडले होते. संबंधित घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले आहे.

शिवण नदीच्या पुरात दोघे अडकले; नागरिकांच्या सहाय्याने बचावले

नंदुरबार तालुक्यातील आंबेबार, धनीबारा, खोलघर या धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. या धरणातील पाण्याचा विसर्ग वीरचक धरणात सोडण्यात आल्याने वीरचकच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवण नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

शिवणनदी काठोकाठ वाहत असल्याने अनेक जण या नदीपात्रात वाहने धुतात. दोन भाजीपाला व्यवसायिकांनी खामगाव जवळील शिवण नदी पुलाजवळ टेम्पो वाहन धुण्यासाठी नदीपात्रालगत उभे केले. यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने शिवण नदीला पूर आला. या पुरात हे दोघेही अडकले होते. दोघांनी तुटलेल्या पुलाच्या भिंतीवर चढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

सुमारे एक तास ते अडकून होते. या घटने संदर्भात अधिक माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, पोलीस विभाग, नंदुरबार नगरपालिका अग्नीशमन विभागाचे कर्मचारी व स्थानिक पोहोणार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पथकांसह स्थानिक पोहोणार्‍यांनी मदतकार्य करत पुरात अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, शिवण नदीत वीरचकमधील पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीकाठी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details