महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2022, 8:22 PM IST

ETV Bharat / state

Nandurbar Rape Case: बलात्काराच्या तपासातील हलगर्जीपणा भोवला; दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

धडगाव तालुक्यातील बलात्कार व हत्या प्रकरणी (Dhadgaon Rape and Murder Case) कामात कसूर केल्याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित (Two Police Officers Suspended) करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी. शेखर पाटील यांनी याबाबत आदेशित केले आहे. या दोन्ही अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. (Rape Investigation Laxity Nandurbar)

दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील बलात्कार व हत्या प्रकरणी (Dhadgaon Rape and Murder Case) कामात कसूर केल्याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित (Two Police Officers Suspended) करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी. शेखर पाटील यांनी याबाबत आदेशित केले आहे. या दोन्ही अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. (Rape Investigation Laxity Nandurbar)

बलात्काराच्या तपासात हलगर्जीपणा करणारे दोन अधिकारी निलंबित

अखेर पोलीस अधिकारी निलंबित -नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित संशयित प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी. शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पीडित मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार होऊन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जे.जे. रुग्णालयात पीडिताच्या कुटुंबीयांच्या मागणी नुसार पुर्नशवविच्छेदन देखील झाले असून या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. या प्रकरणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती; मात्र नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबणाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपपोलीस निरीक्षक बी.के महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे.


राजकीय पदाधिकाऱ्यांकडून निलंबनाची मागणी -धडगाव पोलीस ठाण्याची दोन पोलिस अधिकारी व चार कर्मचारी यांची पोलीस अधीक्षकांनी बदली मुख्यालयात केली होती. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांची निलंबन करण्याची मागणी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details