नंदुरबार -नवापूर तालुक्यातील गडदाणी गावाच्या परिसरामध्ये दोन बिबट्यांची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. विषप्रयोग करून या दोघा नर-मादी बिबट्यांची शिकार झाल्याचा संशय वन विभागाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. नवापूर तालुक्यातील गडदाणी शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार आहे. याचा फायदा घेत बिबट्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री केली जात आहे.
शिकार्यांनी कापले बिबट्याचे अवयव -
मांजर कुळातील बिबट्या या प्राण्याच्या कातडीला आणि नखांना मोठी किंमत मिळते. दोन्ही बिबट्यांची शिकार करून त्यांच्या अंगावरची कातडी काढण्यात आली. त्यांचे पंजेही कापून टाकण्यात आले आहेत. विक्रीसाठी पंजे आणि कातडी काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.