नंदुरबार- धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील रायगंण नदीच्या पुलावरून कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार 35 फूट पुलावरून रायगंण नदीत कोसळली. यावेळी चालक व एक प्रवासी जखमी झाला.
राष्ट्रीय महामार्गावरील रायगंण पुलावरून कार नदीत कोसळली, दोन जखमी - नंदुरबार कार अपघात बातमी
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुलावरून साधारण 35 फूट खोल पाण्यामध्ये गाडी कोसळल्याने अपघात झाला. जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
![राष्ट्रीय महामार्गावरील रायगंण पुलावरून कार नदीत कोसळली, दोन जखमी two injured due to car collapsed in raigan river at nandurbar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11:01:57:1596864717-mh-ndb-02-highway-accident-mh10020-08082020105151-0808f-1596864111-820.jpg)
नदीत पाणी असल्याने दोन जण बुडूत असताना स्थानिक लोकांनी नदीत उडी मारून दोघांना बाहेर काढले. 108 रूग्णावाहिकेतून पायलट लाजरस गावित यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुलावरून साधारण 35 फूट खोल पाण्यामध्ये गाडी कोसळल्याने अपघात झाला. जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शुुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास
कार (क्रमांक एम. एच. 19.- सी. व्ही. 1910) जळगाव जिल्ह्यातील जामनेरहून गुजरात राज्यातील बडोदा येथे जात असताना नवापूर तालुक्यातील रायगंण पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमध्ये दोनच व्यक्ती होते श. चालक शुभम राजेश पटेल (वय 24) बडोदा (गुजरात), विपूल गोपाल पटेल (वय 28 भटाईनगर जामनेर जिल्हा जळगाव) जखमी झाले. यात चालक शुभम पटेल यांची प्रकृती गंभीर असून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.