महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला उडवले; आजोबासह नातवाचा मृत्यू - नंदुरबार अपघात न्यूज

भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यात पाच वर्षीय नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घोटाणे गावाजवळ घडली आहे.

nandurbar accident
नंदुरबारमध्ये अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू

By

Published : Nov 26, 2019, 8:58 AM IST

नंदुरबार- भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यात पाच वर्षीय नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घोटाणे गावाजवळ घडली आहे. या घटनेमुळे घोटाणे गावावर शोककळा पसरली असून सोमवारी सायंकाळी उशिरा या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू

हेही वाचा -'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा

सध्या गहू पेरणीचा हंगाम सुरू असल्याने घोटाणे येथील नानाभाऊ उखा धनगर हे गव्हाचे बियाणे घेण्यासाठी दोंडाईचा येथे गेले होते. डिस्कव्हर मोटारसायकलने (एमएच 39 एच 6724) दोंडाईचाकडून घोटाणे गावी परत येत होते. यावेळी नंदुरबारकडून दोंडाईचाकडे भरधाव वेगात जाणारी स्कॉर्पिओने (जीजे.19 ए 8362) दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नानाभाऊ उखा धनगर (55 वर्ष) व त्यांचा नातू रोहित भटु धनगर ( 5 वर्षे) हे दोघेही दूरवर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागून शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला.

नंदुरबारमध्ये अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच घोटाणे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आजोबा व नातवाला तत्काळ दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केले.

जितेंद्र दुर्लब धनगर यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ चालक राजेश जयचंद थवाने (रा.सोनगढ, गुजरात) यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मोटारवाहन कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल बागल करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details