महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निजामपूर गावाजवळ बस व ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार, 23 जखमी - बस व ट्रकमध्ये भीषण अपघात

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक महिला प्रवाशी ठार झाली.

accident
अपघात

By

Published : Dec 9, 2020, 8:25 PM IST

नंदुरबार - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक महिला प्रवाशी ठार झाली. तर, अन्य २३ जण जखमी झाले आहेत. ही घटना निजामपूर गावापासून दोन किमी अंतरावर घडली. अपघात घडल्यानंतर लगेच परिसरातील नागरिक, वाहतुकदार व पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

निजामपूर गावाजवळ बस व ट्रकमध्ये भीषण अपघात

एक ठार, तर 23 जखमी

पिंपळगाव-नंदुरबार ही एसटी बस (क्र. एम.एच 14- बी.टी.3752) निजामपूर होऊन नंदुरबारला प्रवासी घेऊन जात असतांना समोरुन येणारा मालवाहू ट्रक व बसची जोरदार धडक झाली. या अपघातात एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर अन्य 23 प्रवासी जखमी झाले आहेत.

ग्रामस्थांनी केली मदत

परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णांलयात दाखल केले. या घटनेची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमींना निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काहींना धुळे व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

काहीकाळ वाहतूक ठप्प

अपघातामुळे निजामपूर-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. या घटनेत बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details