नंदुरबार - जिल्ह्यात पुन्हा 48 कोरोनाबाधित रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात सर्वाधिक नंदुरबार शहरातील रुग्ण असल्याने नंदुरबार शहरात 40 ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. बाधितांचा आकडा 603 वर पोहोचला आहे. बाधितांपैकी दोघा रूग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 48 कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू - total corona count nandurbar
आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 34 रूग्णांचे बळी गेले आहेत. तर 382 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या 170 बाधित रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काल 48 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नवापूर तालुक्यातील देवळफळी येथील 56 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय पुरुष, शहादा येथील नागसेन नगरातील 70 वर्षीय महिला, गरीब नवाज कॉलनी 50 वर्षीय महिला, तळोदा येथील 52 वर्षीय महिला नंदुरबार येथील संभाजीनगर 21 वर्षीय पुरुष, एकलव्य कोविड सेंटर नंदुरबार 23 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय नंदुरबार 35 वर्षीय पुरुष, खंडेराव पार्क नंदुरबार 27 वर्षीय पुुरुष, तैलिक मंगल कार्यालयासमोर 52 वर्षीय पुरुष, डीआर हायस्कूल जवळ 43 वर्षीय पुरुष, चित्ते नगर 31 वर्षीय महिला, अमृत चौक 55 वर्षीय महिला, स्वराज नगर 64, 33,35 वर्षीय पुरुष, माळीवाडा 40, 11, 16 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय बालिका, शिरीष मेहता रोड 48 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर 48 व 22 वर्षीय पुरुष, हाट दरवाजा 22 वर्षीय पुरुष, मोठा मारुती जवळ 50 वर्षीय पुरुष, चौधरी गल्ली 35 व 8 वर्षीय पुरुष, 58 व 28 वर्षीय महिला, विमल हौ.सोसायटी 38 वर्षीय महिला, हरिओम नगर 18, 8, 34, 65, 35 वर्षीय पुुरुष, 55 वर्षीय महिला, 6 व 2 वर्षीय बालिका, तापी क्वॉरंटाईन सेंटर-40 वर्षीय पुरुष, 38, 50, 19, 30 वर्षीय महिला, 4 वर्षीय बालिका, वाघोदा शिवार 28 वर्षीय महिला, तळोदा येथील गुरुकृपा कॉलनी 65 व 32 वर्षीय महिला, 42 पुरुष अशा या 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नंदुरबार येथील कुंभार गल्लीतील एका बाधिताचा समावेश आहे.
नंदुरबार शहरात सर्वाधिक रुग्ण असल्याने शहरात चाळीस ठिकाणी कंटेनमेंट होऊन तयार करण्यात आले असून बाधीत राहत असलेल्या परिसरात आरोग्य विभाग व नगरपालिकेतर्फे निर्जंतुकीकरण करून फवारणी करण्यात येत आहे. त्याच्याबरोबर आरोग्य विभागातर्फे बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेतला जात असून बाधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री देखील तपासली जात आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्याभरात 34 रूग्णांचे बळी गेले आहेत. तर 382 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या 170 बाधित रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात एका दिवसात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
दिवसभरात दोघांचा मृत्यू.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण नंदुरबार शहरात.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा 600 टप्पा पार.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या...603
बरे झालेले रुग्ण.....382
उपचार सुरू असलेले रुग्ण....170
मयत रुग्णाची संख्या 34