नंदुरबार -काही दिवसांपूर्वीनवापूर येथेएकाकारमध्ये सुरत येथील रहिवासी भावेश मेहता यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर नवापूर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत याप्रकरणी दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेतील अजून पाच संशयीत आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी असा घेतला आरोपींचा शोध -
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठत नवापूर शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, लॉज, पेट्रोलपंप येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. यात 16 जून रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणालमध्ये भावेश मेहता हे 5 ते 6 व्यक्तींसोबत प्रवेश करत असल्याचे दिसून आले होते. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल उरविशा येथेदेखील घटनेच्या दिवशी 5 ते 6 संशयीत आरोपींजवळ दिसून आले होते. या सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी तत्काळ एक पथक सुरत येथे रवाना केले. नंदुरबारच्या पोलीस पथकाने तीन दिवस सतत परिश्रम घेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेले संशयित हे सुरत आणि नवसारी येथे दारुची अवैध तस्करी करणारे व सुपारी किलर असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर एक पथक नवसारी येथे रवाना करण्यात आले. अखेर पोलिसांना यापैकी एका आरोपीच्या घराचा पत्ता मिळाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आकाश रमेशभाई जोरेवार (21), याला अटक केली. या संदर्भात त्याच्याकडे चौकशी केली असता, अवैध दारु तस्करीच्या वादातून भावेश मेहता याची हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अन्य आरोपी आकाश जोरेवार आणि अरविंदभाई ओढ यांना सुद्धा अटक केली. त्यानंतर त्यांना नवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा -अनिल देशमुखांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...