नंदुरबार - जीपमधून सुका गांजाची वाहतूक होत असल्याने पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालक वेगात पुढे निघून गेला. पथकाने पाठलाग करत वाहन पकडल्याने त्यात 61 किलो 135 ग्रॅम वजनाच्या सुक्या गांजासह 9 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
एलसीबीने रचला सापडा
धडगांव येथून शहाद्याकडे चारचाकी वाहनातून सुका गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यांनी पथकास कारवाईच्या सूचना दिल्या असता रात्री 8.30 वाजेदरम्यान एलसीबीचे पथक शहादा तालुक्यातील दरा फाट्यावर सापळा रचून होते. यावेळी येणार्या वाहनांचे निरीक्षण करत असताना एका चारचाकी जीप गाडीवर पोलिसांना संशय आला. त्यांनी बॅटरीच्या सहायाने वाहन थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने भरधाव वेगात पुढे निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करत शिताफीने गाडी पकडली. चालक व सहचालकास विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.