नंदुरबार- नवापूर तालुक्यातील धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ एका ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. नागपूरहुन गुजरात राज्यातील सुरतहून येत असताना या ट्रकला (एम. एच.11 - ए.एल. 7569) आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केल्याने ट्रक जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहितीसमोर आली आहे.
शॉर्टसर्किटमुळे ट्रक जळून खाक; जीवितहानी नाही - शॉर्टसर्कीट
धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गावच्या शिवारात पहाटेच्या सुमारास सुरतहून धुळ्याकडे जाणारा ट्रक कॅबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीने थोडळ्याच वेळात रौद्ररुप धारण करत संपूर्ण कॅबिनलाच कवेत घेतले.
धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गावच्या शिवारात पहाटेच्या सुमारास सुरतहून धुळ्याकडे जाणारा ट्रक कॅबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीने थोडळ्याच वेळात रौद्ररुप धारण करत संपूर्ण कॅबिनलाच कवेत घेतले. मालट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिसांनी सतर्कता दाखवत सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी, पो.कॉ.सूर्यवंशी, कुमावत, दिपक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत धगधगत्या मालट्रकच्या कॅबिनवर पाणी मारुन आग विझविली. त्यानंतर ट्रकचालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.
या आगीत ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महामार्गावर काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. मालट्रकची डिझेल टाकी फुटेल या भीतीने महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्गाच्या दुरावस्थामुळे अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीसही दाखल झाले होते. सदर आगीच्या घटनेमुळे नागपूर सुरत महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी विसरवाडी आणि महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे.