नंदुरबार- नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ एक माल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत परिसरातील नागरिकांनी ट्रकमधील माल पसार केला.
साबणांचा ट्रक उलटल्याने चोरट्यांची 'धुलाई'; ट्रकात उरला नाही एकही साबण - नंदुरबार
नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ एक माल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे झाला. दरम्यान, पहाटे अंधाराचा फायदा घेत परिसरातील लोकांनी ट्रकमधील माल पसार केला.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी दरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम बंद अवस्थेत असल्याने या रस्ताच्या दुरवस्थेत वाढ होत आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे याठिकाणी एक साबणांनी (रिन व व्हील) भरलेल्या ट्रकचा अपघात झाला.
हा अपघात पहाटे झाल्याने अंधाराचा फायदा घेत परिसरातील नागरिकांनी ट्रक भर साबणांचा माल पसार केला. अपघात झालेल्या ट्रकमध्ये साबणाचा तुकडासुद्धा राहू दिला नाही. ट्रकमधील पूर्ण माल चोरी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे मॅनेजर हेमंत वर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, जखमी ट्रक चालकाला उपचारासाठी साक्री येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.