महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये आदिवासी शिक्षकांचे आमरण उपोषण - non granted school nandurbar

लुक्यातील दुधाळे येथील माध्यमिक विद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यन्वित असलेल्या शिक्षकांना वंचित ठेऊन शाळा प्रशासनाने परस्पर दुसऱ्या शिक्षकांचे वेतन दिले.

आमरण उपोषण

By

Published : Mar 7, 2019, 10:14 AM IST

नंदुरबार- तालुक्यातील दुधाळे येथील माध्यमिक विद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यन्वित असलेल्या शिक्षकांना वंचित ठेऊन शाळा प्रशासनाने परस्पर दुसऱ्या शिक्षकांचे वेतन दिले. याचा निषेध करत अन्याय करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षकांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

आमरण उपोषण

राज्य सरकारच्या नवीन शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात आले. मात्र, यात शाळांमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकांना डावलण्यात आल्याने शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या चुकीच्या कामाच्या चौकशीची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details