नंदुरबार -सातपुड्यातील आदिवासी भागात सध्या गावदेव पूजनाची लगबग सुरू आहे. आदिवासी समाज निसर्ग पूजक असून पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्या भाज्या आणि नवीन धान्य यांचे पूजन केल्याशिवाय नवीन धान्य आणि भाजीपाला दैंनदिन जीवनात वापरला जात नाही. प्रत्येक गावाच्या वेशीवर गावदेव असतो, अशी आदिवासींची मान्यता आहे. त्या ठिकाणी गावातील नागरिक, पंच मंडळी आणि पुजारी सागाच्या झाडाच्या पानावर नवीन धान्य हिरव्या व भाज्या ठेवून त्यांची पूजा करून ते निसर्गाला अर्पण करतात.
सातपुड्यात आदिवासींची गावदेव पूजनाची लगबग सुरू - सातपुडा आदिवासी समाज न्यूज
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाज निसर्ग पूजक असून पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्या भाज्या आणि नवीन धान्य यांचे पूजन केल्याशिवाय त्याचा दैंनदिन जीवनात वापर केला जात नाही. प्रत्येक गावाच्या वेशीवर गावदेव असतो, अशी आदिवासींची मान्यता आहे.
पूजा
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने येथे विविध परंपरा व चालीरीती आहेत. याचाच एक भाग म्हणून सातपुड्यातील आदिवासी बांधव ग्रामदैवतचे(गावदेव) पूजन करत असतात. ही पूजा करत असताना आदिवासी संस्कृतीमधील निसर्ग पूजनासाठीचे वाद्य वाजवले जाते. गावावरील आणि शेतीवरील संकट दूर व्हावे, म्हणून ही पूजा केली जाते. सातपुड्यातील दुर्गम भागात गावदेवाची पूजा झाल्यानंतर रानभाज्या आणि इतर धान्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होतील.