नंदुरबार -आदिवासी समाज सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये येत्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळणार आहे.
आदिवासी समाज जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचे सांगितले जाते. इसवी सन १२४६ पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे. ढोल, बासरी आणि शिट्यांचा तालावर पारंपारिक पेहराव करुन आदिवासी काठी घेऊन नृत्य करतात. रात्रभर नृत्य कल्यानंतर पहाटे सूर्योदयापूर्वी ही होळी पेटवली जाते.