नंदुरबार -आदिवासी विकास विभागाने जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवला होता.
नंदुरबारमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन - जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव, नंदुरबार
आदिवासी विकास विभागाने जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. शहरी भागातील महिलांमध्ये या महोत्सवाचे विशेष आकर्षण दिसून आले.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला, नागपूर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
या महोत्सवात आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. आरोग्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व आदिवासी महिलांनी समजावून सांगितले. शहरी भागातील महिलांमध्ये या महोत्सवाचे विशेष आकर्षण दिसून आले. या महिलांनी रानभाज्यांची माहिती आणि महत्त्व समजावून घेतले. नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये आश्रमशाळांना सोबत घेवून राबवलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.