महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचे नंदुरबारमध्ये आंदोलन - k c padvi

नंदुरबार-तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या विविध २० समस्यांचे निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी आदिवासी विकासमंत्री ॲड. के सी पाडवी यांना निवेदन देण्यात आले होते. त्याच्या पाठपुराव्यासाठी आंदोलन करण्यात आले.

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचे नंदुरबारमध्ये आंदोलन
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचे नंदुरबारमध्ये आंदोलन

By

Published : Feb 6, 2021, 8:05 AM IST

Updated : Feb 6, 2021, 4:53 PM IST

नंदुरबार - आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी शुक्रवारी नंदुरबारमध्ये धरणे आंदोलन केले. वर्ष उलटूनही जिल्हा प्रशासनाने आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या विविध समस्यांचे निवारण न केल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

आदिवासी विकास मंत्री ॲड. के सी पाडवी यांनीही डीबीटी प्रश्नावर घुमजाव केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. बीटीपीचे जिल्हाध्यक्ष के टी गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवापूर तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला.

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचे नंदुरबारमध्ये आंदोलन

वर्षभरानंतरही समस्यांचे निवारण नाही
नंदुरबार-तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या विविध २० समस्यांचे निवारण करण्यासाठी गेल्यावर्षी आदिवासी विकासमंत्री ॲड. के सी पाडवी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यात डीबीटी योजना बंद करावी, या योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, किचन शेडमधून पुरविल्या जाणाऱ्या जेवणातून आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, योजनांना आदिवासी क्रांतीकारी महापुरुषांची नावे देण्यात यावीत अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

पालक मंत्र्यांचे घुमजाव; आंदोलकांचा आरोप
विद्यमान आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी डीबीटी योजनेला विरोध केला होता. मात्र मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यावर त्यांनी या प्रश्नावर घुमजाव केल्याचा आरोपही गावित यांनी यावेळी केला.

पालकमंत्र्यांच्या घरी तुरी आंदोलन काढण्याचा इशारा
या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी यांच्या घरावर आदिवासी पारंपरिक तूर वाद्य वाजवित हजारोंच्या संख्येने मोर्चा काढतील असा इशारा गावित यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 6, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details