नंदुरबार- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण कोरोनावर मातही करत आहेत. मात्र, काही रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरत आहे. धुळवद येथील 47 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 7 वर पोहोचला आहे.
शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाला श्वास घेण्याचा त्रास होत होता. मृत्यूपूर्वी वृद्धाची कोरोना चाचणी केली होती. मात्र, अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यामुळे खबरदारी म्हणून मृत वृद्धावर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.