नंदुरबार- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात 13 जणांची बोट उलटली आहे. यातील स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी 6 जणांचे प्राण वाचवले आहेत, तर पितापुत्रासह एकाचा बूडून मृत्यू झाला आहे, तर यातील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.
उच्छल तापी नदीत 13 जण असलेली बोट बुडाली; तिघांचा मृत्यू, चार बेपत्ता - उच्छल तापी नदीत बोट बुडाली
होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी गेले होते. भिंतखुद गावाजवळ वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बोट अनियंत्रित झाल्याने दुपारी चारच्या सुमारास बोट पलटली.
हेही वाचा-जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण
होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी गेले होते. भिंतखुद गावाजवळ वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बोट अनियंत्रित झाल्याने दुपारी चारच्या सुमारास बोट उलटली. बोटीवरील नागरिकांनी आरडाओरड सुरू करताच परिसरातील मच्छीमार मदतीसाठी धावले. यात सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. सुंदरपूर नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे सुंदरपूर गावात शोककळा पसरली आहे. या अपघातात नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समोवश आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्नीशमन दलाची टिम घटनास्थळी पोहोचली आहे.
बोटीतील व्यक्तींची नावे-
एंजल्स कोकणी (वय 15 रा. सुंदरपूर), राकेश बळीराम कोकणी (वय 32, रा सुंदरपूर ता.उच्छल जिल्हा तापी गुजरात) हे भारतीय स्टेट बँकेत शिपाई म्हणून नोकरी करीत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब पाण्यात गेले. विकास राजू गामित (वय 20 रा वणझारी ता.उच्छ्ल), सुमित पारध्या गामित (वय 22 रा भींतखुद ता.उच्छ्ल), दिनेश देवाजी वळवी (वय 28 रा. वणझारी ता. उच्छ्ल), जिग्नेश नारू कोकणी (वय 20 सुंदरपूर ता.उच्छल), याकुब भीमसिंग कोकणी (वय 28 रा.सुंदरपूर), संजना कोकणी (वय 14), अभिषेक कोकणी (वय 12), आराहण कोकणी (वय 09) उर्मिला कोकणी (वय 22), विनोद बुध्या कोकणी (वय 18) सर्व रहणार सुंदरपूर, असे बोटीमधील व्यक्तींचे नावे आहेत.