नंदुरबार - शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील व मालेगाव येथे कार्यरत असलेल्या पशुधन अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सारंगखेडा ग्रामपंचायतीने गाव आणि परिसर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीन दिवस आपले व्यवसाय बंद ठेवून जनता कर्फ्यू सामील झाले आहेत.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सारंगखेडा परिसरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू - नंदुरबारमधील सारंगखेडात कोरोना रुग्ण
सारंगखेडा येथील रहिवाशी व मालेगाव येथे पशुधन अधिकारी म्हणून कार्यरत व्यक्ती मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह आढळली, हा अधिकारी मालेगावला जाण्यापूर्वी आपल्या मूळ गावी सारंगखेडा येथे मुक्कामी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावात तीन दिवस जनता कर्फ्यूची हाक दिली.
सारंगखेडा येथील रहिवाशी व मालेगाव येथे पशुधन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला मालेगाव येथे कोरोनाची लागण झाली. सदर अधिकारी मालेगाव येथे जाण्यापूर्वी आपल्या मूळ गावी सारंगखेडा येथे मुक्कामी असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गावात तीन दिवस जनता कर्फ्यूची हाक दिली. यात व्यापारी व शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत.
सारंगखेडा ग्रामपंचायतने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिक आणि व्यापारी यांनी प्रतिसाद देत सर्वच व्यवहार ठेवले आहेत. ज्या ठिकाणी या पशुधन विस्तार अधिकाऱ्याचे निवासस्थान आणि पशुवैद्यकीय दवाखाना आहे, तो परिसर सील करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात फवारणीही करण्यात येत आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.