नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना परवानगी नाही. असे असतानाही दुकाने सुरू ठेवणार्या नंदुरबार शहरातील ३० दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. कपड्यांची 15 दुकाने, फुटवेअरची 2 दुकाने, भांड्याचे 1, हार्डवेअर 1, इलेक्ट्रॉनिक्सच 1, ज्वेलर्स 4, झाडूचे 1 तर बांगड्याच्या एका दुकानाचा समावेश आहे. नगरपालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या पथकाद्वारे वारंवार सूचना करून देखीलही व्यावसायिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
नंदुरबारात 30 दुकानांवर कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासन व नगरपालिका पथकाने केली कारवाई -
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. किराणा, भाजीपाला यासह नाशवंत वस्तूंची दुकाने सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच उर्वरित आस्थापने बंद राहतील, असे निर्देश जारी केले आहेत. परंतु, या आदेशांचे उल्लंघन करून काही दुकाने सुरू असतात. अखेर काल(गुरुवार) जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी शहरातील विविध भागात फिरुन परवानगी नसताना सुरू असणारी दुकाने सील केली.
कारवाई झालेली दुकाने -
नंदुरबार शहरातील घी बाजारात दिपेश कलेक्शन, हुतात्मा स्मारक चौकात विराज कलेक्शन, माणिक चौकात चॉईस साडी सेंटर, ओमशांती मॅचिंग सेंटर, ओस्वाल कापड दुकान, धनश्री एन्टरप्रायझेस, विपुल कलेक्शन, वर्धमान कलेक्शन, गणपती मंदिराजवळ ओमशांती कापड दुकान, संजय रेडीमेड, सराफ बाजारात एम.एम.ज्वेलर्स, सोनार गल्लीत दत्त ज्वेलर्स, संतोष सोनार एम.एम.ज्वेलर्स, अमर हार्डवेअर, शिवाजी चौकात भुवनेश्वर साडी सेंटर, केशवभाऊ कंपनी, बालाजी वाड्यात सोनी ज्वेलर्स, मंगळ बाजारात प्रिया हेन्स हाऊस, रस्त्यावर लॉरीचे दुकान, राजक्लॉथ रेडीमेड, साई लेडीज वेअर, जुने नगरपालिकेजवळ श्रीनिवास इलेक्ट्रॉनिक्स, शास्त्री मार्केटजवळ भारत झाडु सेंटर, अंबिका मेन्स वेअर, नुतन कन्या विद्यालयाजवळ भगवती फुटवेअर, अहिल्याबाई विहीर परिसरात जगदंबा कलेक्शन, कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये साई बँगल्स, नवशक्ती कॉम्प्लेक्स अजय मोबाईल, बसस्थानक परिसरात अपना फुटवेअर, पालिका शाळा क्र.1 जवळ इलेक्ट्रीक व वाईंडींग दुकान यांच्यावर कारवाई झाली.