नंदुरबार - नवापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. लेखा विभागातील दोन कपाटात चोरी झाली असून जाणकार व्यक्तीनेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नवापूर महाविद्यालयात लाखो रुपयांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद - नवापूर महाविद्यालय नंदुरबार
नुंदरबारमधील नवापूर महाविद्यालयात चोरी झाली असून दोन चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
नवापूर महाविद्यालयात लाखो रुपयांची चोरी
महाविद्यालयाचे शिपाई विजय कुलकर्णी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाचे कार्यालय उघडण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यालयाचे दरवाजे उघडे होते. तसेच सर्व कागदपत्रे पडलेले होते. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून महाविद्यालयातील सातही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये कार्यालयाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेरा उलटा करून ही चोरी केल्याचे दिसून आले.