नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह आमदार व खासदार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता त्यांचीही तपासणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात खबरदारी म्हणून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना आणि जिल्हा खरीप आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. बैठकीसाठी जिल्हाभरातील अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनाही कार्यालयात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येत होती.

कर्मचारी किंवा येणाऱ्या व्यक्तींपैकी ज्यांना ताप किंवा अन्य लक्षण असेल त्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. यावेळी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जात असली तरी, पालकमंत्री नंदुरबारात आल्याने प्रशासन अधिक सज्ज असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत होता. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी आणि सॅनीटायझर देऊन काळजी घेतली जात होती.