महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2019, 8:28 PM IST

ETV Bharat / state

खैरवे धरण फुटल्याची अफवा, कालव्याला गळती लागल्याने पडले मोठे भगदाड

नवापूर तालुक्यातील खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याला गळती असल्याने मोठे भगदाड पडल्याची अफवा. कालव्याला लागलेल्या गळतीमुळे शेतीचे नुकसान.

खैरवे कालव्याला गळती

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील खैरवे धरणाचा उजवा कालव्याला गळती असल्याने मोठे भगदाड पडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यासंदर्भातील माहिती सकाळच्या सुमारास समजल्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी संबधित जलसंपदा विभागाचे अभियंत्यांना संपर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र, या प्रकरणाची पहाणी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे कर्मचारी रात्री उशीरा पोहोचले.

खैरवे कालव्याला गळती

खैरवे धरण फुटल्याच्या अफवांनी नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसलीपाडा, आंबाफळी, बोरचक, शेगवे गावातील गावकरी भयभीत झाले होते. उजव्या कालव्यात विमोचक जवळ गळती लागल्याने जवळील शेतात पाणी शिरले. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विषयी बोलताना धरण सुरक्षित आहे. धरणाला धोका नाही, कालवा बंद करण्यात आला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यात विमोचन जवळ गळती लागली आहे. धरणाला कोणताही धोका नाही, असे सहायक अभियंते सुमान गावित यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details