नंदुरबार - ( Nandurbar Flood ) सरपणी नदीला आलेल्या पुरामुळे ( Sarpani river floods ) विसरवाडी जवळ नदीचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने सुरत- अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वरची वाहतुक ठप्प झाली आहे. नवापुर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असुन यामुळे विसरवाडी परिसरातील नेसु, सरपणी आणि नागण नद्यांना पुर आला आहे. सकाळी आठच्या सुमारास विसरवाडीच्या पुलावरुन पाणी जावु लागल्याने पोलीसांनी या महामार्गावरची वाहतुक बंद केली होती. नंतर सुरत कडुन येणारी वाहने नंदुरबार मार्गे तर धुळ्याकडुन येणारी वाहने दहीवद मार्ग वळविण्यात आली आहे. दरम्यान पुलावरुन पाणी गेल्यानंतर पाच किलोमीटर पर्यत वाहनाच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या.
अभियंत्यांची बघायची भूमिका-राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे(National Highway ) पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी आलेले अभियंत्यांनी उपायोजना न करता बघायची भूमिका घेतली.नवीन पूल होत नाही तोपर्यंत जुना पूल तोडायला नको होता. आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. महामार्ग चौपदरीकरणाऱ्या ठेकेदाराचा नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला ताकीद देण्याची गरज आहे.
पर्यायी रस्ता मार्गाचा वापर-विसरवाडी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाल्याची माहिती वाहन चालकांना मिळतात त्यांनी आपला मार्गात बदल केला आहे. सुरत ऊन येणारे वाहन नवापूर उचल मार्गे नंदुरबार धुळ्याकडे जात आहेत तर धुळ्याहून येणारे वाहन देखील याच मार्गाने जात असल्याचे चित्र दिसून आले. महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्ग साक्री तालुक्यातील शेवाळी, नंदुरबार ते निझर, उच्छल,गांधीनगर असा मार्ग देण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.