नंदुरबार- मुस्लिम समाजाला गोहत्याच्या नावाखाली लक्ष केले जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी शहादा शहरात मुस्लिम समाज आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत झालेल्या घटनांचा निषेध केला आहे. गोहत्येचे नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट केले जाते. हिंदू संघटनांद्वारे मुस्लिम समाजावर अत्याचार झालेल्या घटनांचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
गोहत्येवरून मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याने नंदुरबारमध्ये आंदोलन - रॅली
मुस्लिम समाजाला गोहत्याच्या नावाखाली टार्गेट केले जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी शहादा शहरात मुस्लिम समाज आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत झालेल्या घटनांचा निषेध केला आहे.
मुस्लिम समाजातील नागरिकांवर हिंदुत्ववादी संघटनाद्वारे गोहत्या, चोरी, फसवणुकीच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना मारहाण करून हत्या करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. हिंदुत्ववादी संघटनाद्वारे वंचित अल्पसंख्यांक समाजाला गोहत्याच्या नावाखाली टारगेट केले जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी शहादा शहरात मुस्लिम समाज आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत झालेल्या घटनांचा निषेध केला. यावेळी दोषींवर कारवाई करावी. या मागणीसाठी शहादा शहरातून रॅली काढत आली. पोलीस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुस्लिम बांधव उपस्थित होते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने यावर योग्य ते पाऊल उचलावे, अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांद्वारे करण्यात आली.