नंदुरबार - नवापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरणातील बदल आणि अतीपावसामुळे डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत.
नवापूर शहर व लगतच्या कॉलनी परिसरांमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. गल्लोगल्ली डास आढळत आहेत. यामुळे रुग्ण संख्येत वाढ होऊन दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. ताप, थंडी, मलेरिया या आजारांचे रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जिल्हात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अती पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहते. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.