नंदुरबार- नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्षभरापूर्वी उचीशेवडी शिवारातील धरण फुटले होते. त्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत काही जनावरेही वाहून गेली. तसेच सखल भागातील शेतांमधील विहिरी व बोरवेलध्ये धरणाचा गाळ साचला आहे. शिवाय नदीत असलेले वीज पंप वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. मात्र या नुकसानीची प्रशासनाने अद्यापही पाहणी केलेली नाही.
उचीशेवडी शिवारातील फुटलेल्या धरणाकडे वर्षभरानंतरही दुर्लक्षच; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
उचीशेवडी शिवारातील धरण फुटल्याने शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत काही जनावरेही वाहून गेली. तसेच सखल भागातील शेतांमधील वहिरी व बोरवेलध्ये धरणाचा गाळ साचला आहे. शिवाय नदीत असलेले विज पंप वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले. मात्र अद्यापही प्रशासनाने याची पाहणी केलेली नाही.
धरणाची दुरुस्ती न झाल्याने धरण फुटल्या गेले आहे. दरवर्षी यामधून पाणी वाहून जावून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यात आणखी यावर्षीही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. लघु सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. पाटबंधारे विभागाने उचीशेवडी शिवारातील फुटलेले धरण आमच्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. वर्षपूर्तीनंतरही धरणाच्या दुरुस्तीसंदर्भात कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
एकीकडे पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगतात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच शासनातील अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावरून शेतकऱ्यांसाठी सरकार आणि प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे, हे दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याला डॉ. राजेंद्र भारूड एक सक्षम जिल्हाधिकारी लाभले आहे. त्यांनी तरी या आदिवासी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.