नंदुरबार -दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रॅक्टिकल परीक्षा घेणे हे सर्व वेळेत पूर्ण करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, हळहळू काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र शाळा सुरू झाल्यानंतर कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर होते. शाळा सुरू झाल्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
नवीन अभ्यासक्रमामुळे अडचणी