नंदुरबार -नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेऊन लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी याकरिता जिल्हा प्रशासनाने काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
'नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा' - नंदुरबार रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार
जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आले आहेत. त्या अनुषंगाने खासदार हिना गावित यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन देऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावे असे म्हटले आहे.
नातेवाईकांची भटकंती
जिल्ह्यात दररोज 800पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहे. रुग्णांसाठी दवाखान्यात बेड उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र जे रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत आहे.
गावित यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आले आहेत. त्या अनुषंगाने गावित यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन देऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावे असे म्हटले आहे.
शहाद्यात रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध
शहादा येथे काही सामाजिक संघटनांच्या वतीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. ही माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच जिल्ह्यातील रुग्णाच्या नातेवाईकांनी शहाद्याकडे धाव घेतली. एकाच दिवसात एक हजारपेक्षा अधिक इंजेक्शनची विक्री झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल स्वरूपात मिळणार शिवभोजन थाळी