नंदुरबार - वाळू माफियांची मुजोरी साऱ्यांना सर्वश्रुत आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात वाळूमाफिया आता निष्पाप लोकांच्या जीवावर उठला आहे. 2 महिन्यापूर्वी नंदुरबार तालुक्यात चक्क भरधाव वाळूचे डंपर एका घरात शिरले होते. यामध्ये दोन युवकांचा बळी गेला होता. त्यानंतर वाळूची बेछूट वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.
अवैध वाळू माफियांवर कारवाई करा; प्रवासी संघटनेची मागणी - Nandurbar breaking news
गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यातून वाळूची अवैधरित्या वाहतूक केली जाते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
अवैद्य वाळू वाहतुकीवर प्रशासनाचे दुर्लक्ष-
गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यातून वाळूची अवैधरित्या वाहतूक केली जाते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ठोस पावले उचलण्याची गरज-प्रवासी संघटनेची मागणी-
जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक, वाळूची अवैध वाहतूक यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पथक नेमण्यात आले असले तरी यातून सुमारे दोनशे वाहनांवर गेल्या चार महिन्यात कारवाया करण्यात आल्या. मात्र वाळूमाफियाच्या मुसक्या आवळण्यासाठी या कारवाया तोकड्या ठरत आहेत. नागरिकांचा नाहक बळी घेणाऱ्या वाळू माफियाच्या मुसक्या आवळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंपी यांनी सांगितले आहे.
वाळू डंपरांनी अनेकांचा घेतला बळी-
अवैधरीत्या वाळू डंपर चालवणाऱ्यांनी अनेकांचा बळी घेतला आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे चार जणांचा बळी घेतला आहे. अजून किती जणांचा बळी हे अवैध वाहतूक चालक घेतील, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा - अब्दुल सत्तार