नंदुरबार - कोरोनामुळे देशात लॉकडॉऊन लागल्याने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अनेकांना आपला व्यापार, व्यवसाय सोडावा लागला. लॉकडॉऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ज्यादा किंमतीने खरेदी कराव्या लागत होत्या. नागरिकांच्या गैरसोयी होऊ लागल्या होत्या. याबाबी लक्षात घेत शहादा तालुक्यातील म्हसावद येथील रेखा पटेल यांनी परिसरातील भगिनींना सोबत घेऊन बचत गटच्या माध्यमातून किराणामाल व्हाट्सअप ग्रुप द्वारे घरपोच द्यावा, तोही योग्य तो बाजार भावतच. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबविण्यात महिलांना यश आले. स्वामिनी महिला बचत गटाच्या ( Swamini Bachat Group Nandurbar ) माध्यमातून विक्री होणाऱ्या किराणामाल नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला व तो अद्यापही त्यांनी चांगल्यारित्या सुरूच ठेवला.
"स्वामिनी बचत गट" स्थापन करून महिलांना केले स्वयंपूर्ण - कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. मात्र, काहींनी या संधीचे सोने केले. शहादा तालुक्यातील म्हसावद येथील आठ महिलांनी एकत्र येऊन "स्वामिनी बचत गट" स्थापन केला. त्यात त्यांनी स्वतःचे भाग भांडवल टाकले आणि व्यवसायाला सुरुवात केली. या दोन वर्षात त्यांनी व्यवसायातून दर महिन्याला हजारोंचा नफा मिळू लागला. कोरोना काळात परिसरातील सात ते आठ महिलांना रेखा पटेल यांनी एकत्र केले आणि किराणा माल आणि मसल्याचा व्यवसाय सुरू केला.
वाजवी दरात व घरपोच किराणा मालाला नागरिकांचा प्रतिसाद -किराणा मालाचे बाजार भाव वाढलेला असतांना त्यांनी वाजवी दरात घरपोच किराणा पोचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला बचत गटाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. बचत गटातील महिन्यांला तीन ते चार लाख रुपयांची उलाढाल होऊ लागली आणि ती वाढत गेली. आता किराणा आणि मसाला विक्रीतून त्यांना हजारो रुपयांचा नफा होत आहे.