नंदुरबार- 50 फूट उंच असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धडगाव तालुक्यातील काकरपाटी सिसा या दुर्गम भागातील ही घटना आहे. महिलेने पन्नास फूट उंच झाडावर चढून आत्महत्या केली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
50 फूट उंच झाडावर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - DHADGAV
महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धडगाव तालुक्यातील काकरपाटी सिसा या दुर्गम भागात घडली आहे. या महिलेने 50 फूट उंच झाडावर चढून आत्महत्या केली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
50 फुट उंच झाडावर गळफास घेऊस महिलेची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर महिला गावातील नसल्याने ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण आहे.