नंदुरबार- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी मोठ्या शहरात येत असतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने ये-जा करीत आसतात. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
नंदुरबारमध्ये बसच्या फेऱ्या न वाढविल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - nandurbar news
ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी बसने ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्याने शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून एस.टी. महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे.
नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावामधील विद्यार्थ्यांना कमी बस फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तर काही गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्याने शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत न जाता आल्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. त्याचप्रमाणे कामानिमित्त नंदुरबार येथे जाणाऱ्या प्रवाशांना देखील हा त्रास सहन करावा लागतो.
या भागात बस फेऱ्या वाढाव्यात अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहेत. मात्र, याकडे एस.टी. महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामपंचायत, सरपंच व पोलीस पाटील यांनीदेखील वेळोवेळी निवेदने देऊनही कुठलाही परिणाम महामंडळ प्रशासनावर होत नाही.