नंदुरबार- येथील सर्वोदय विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनीवेळी परिसारात झालेला कचरा गोळा केला. या कचऱ्याची विल्हेवाट लावून सेंद्रिय खत करण्यात येणार असून ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना खत म्हणून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या स्वच्छता मोहिमने नदीकाठावर घाण करणाऱ्या नागरिकांना संदेश दिला आहे.
नंदुरबारमध्ये गोमती नदी घाट आणि गौतमेश्वर मंदिर परिसराची विद्यार्थ्यांनी केली सफाई - ganesh festival in nandurbar
गणेश विसर्जनावेळी परिसरात झालेला कचरा गोळा करत त्याची विल्हेवाट लावून सर्वोदय विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेद्वारे नदीकाठावर दुर्गंधी पसरवणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून नवा संदेश दिला आहे.
![नंदुरबारमध्ये गोमती नदी घाट आणि गौतमेश्वर मंदिर परिसराची विद्यार्थ्यांनी केली सफाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4436486-56-4436486-1568446527700.jpg)
सर्वोदय विद्या मंदिरचे विद्यार्थी
स्वच्छता मोहिम राबवताना सर्वोदय विद्या मंदिरचे विद्यार्थी
प्रकाशा हे जिल्ह्यातील गणेश विसर्जनाचे मुख्य केंद्र आहे. अनंत चतुर्दशीला येथे गणेश विसर्जन झाल्याने येथील गोमती नदी घाटावर आणि गौतमेश्वर मंदिर परिसरात सर्वत्र केरकचरा, निर्माल्य, प्लास्टिक, विखरले होते. त्यात पाऊस पडल्याने पावसामुळे दुर्गंधीही येत होती. ह्या कचऱ्याचे वर्गीकरण करत विद्यार्थ्यांनी हा कचरा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे.