नंदुरबार - शहरात नवीन वर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने करण्यात आले. शहरातील एच. जे. श्रॉफ विद्यालयात जवळपास 700 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्य नमस्कार करून नवीन वर्षाचे स्वागत केले. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा हा पहिला उपक्रम आहे.
700 विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार घालून केले नवीन वर्षाचे स्वागत - सूर्यनमस्कार नंदुरबार बातमी
नवीन वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी हा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितीत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सूर्यपूजन करण्यात आले.
हेही वाचा-VIDEO : नव वर्ष 2020 च्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष, पाहा काही क्षणचित्रे
नवीन वर्षाचे स्वागत आरोग्यदायी जाण्यासाठी हा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितीत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सूर्यपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम आणि सूर्य नमस्कार यांचे महत्व सांगितले. या आनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शहरातील श्रॉफ विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नवीन वर्षानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार घालून नवीन पायंडा पाडला.