नंदुरबार- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामीण भागात नागरिकांची काळजी घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी पुढे आले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः कापड आणून त्याचे मास्क शिवून गरजवंतांना वाटप करून जनजागृती केली.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाचा स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी पुढे येत स्वत: मास्क शिवून त्यांचे वाटप आदिवासी वस्त्यांम्ध्ये गरजवंत नागरिकांना करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मास्क शिवत हजारो नागरिकांना मास्क वाटप केले असून, याचसोबत प्रकाशा परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये जाऊन स्थानिक बोलीभाषेत कोरोना संदर्भात काळजी घेण्याच्या संदर्भात आवाहन त्यांनी केले.