नंदुरबार- लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदाराने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदाराने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थी पुढे आले आहेत. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या पालकांना मतदान, करण्याचे आवाहन केला आहे. त्यासोबतच विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानाच्या दिवशी लवकर मतदान करण्यासाठी आग्रह करणार आहेत. आज सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात आणि गावातील मुख्य चौकात मतदान करा. या आकारात मानवी साखळी तयार करून मतदानाचा आव्हान केला आहे. विद्यार्थ्यांनी मतदानासाठी सुरू केलेली, ही चळवळ निश्चितच लोकशाही तत्त्वांसाठी पोषक आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये १३ लाखांची रोकड जप्त; स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई