नंदुरबार -जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. तसेच बाधित रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात तात्काळ ऑक्सीजन बेड वाढविण्यात यावे. लॉकडाऊन असुनही सायंकाळी फिरणार्यांवर कारवाई करावी. तसेच कोरोना लसीकरणासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ.हिना गावीत यांनी केली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन करा - हिना गावीत - खासदार डॉ.हिना गावीत
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नंदुरबार शहरात लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे रेल्वे हॉस्पिटल, सिंधी कॉलनी व विविध समाज मंगल कार्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी डॉ.हिना गावीत यांनी केली आहे.
ऑक्सीजन बेड वाढविणे गरजेचे-
जिल्ह्यात महिन्याभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दिवसागणिक 800 ते 850 रूग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची रूग्णांची वाढती रूग्णसंख्या पाहता उपचारासाठी त्यांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु ऑक्सीजन बेडअभावी काही रूग्णांना इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तसेच ऑक्सीजनअभावी काही रूग्णांना मृत्यूलाही मुकावे लागत आहे. म्हणुन जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन बेड वाढविण्यात यावे. आरोग्य यंत्रणेवरील वाढता भार लक्षात घेता वाढीव आरोग्य कर्मचार्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी हिना गावीत यांनी केली आहे.
हिना गावीत म्हणाल्या, दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी. शहरासह जिल्ह्यात सायंकाळी विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करावी. शहरातील चौकांमध्ये सायंकाळनंतरही पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नंदुरबार शहरात लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे रेल्वे हॉस्पिटल, सिंधी कॉलनी व विविध समाज मंगल कार्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी डॉ.हिना गावीत यांनी केली आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेचा लोकलने प्रवास ?