महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2020, 8:58 AM IST

Updated : Apr 19, 2020, 10:49 AM IST

ETV Bharat / state

अनावश्यक बाहेर पडल्यास कठोर कारवाई, नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ.भारुड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार- शहरातील वॉर्ड क्र.10 भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने शहरात संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्यात येत आहे. अशात नागरिकांनी घरातच राहावे. अनावश्यक बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.

येत्या 20 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषधाची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटुंबातील 6 सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाने ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते, तेथील एक डॉक्टर आणि इतर पाच कर्मचारी तसेच अन्य तीन जवळचे नातेवाईक अशा एकूण 15 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तसेच सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ. भारुड यांनी केले आहे.

Last Updated : Apr 19, 2020, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details