नंदुरबार- सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर संतप्त जमावाने रेल्वेस्थानक आणि परिसरात दगडफेक केली. यावेळी रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या मालगाडीवर देखील दगडफेड झाली. रेल्वे स्थानकाच्या लगत असणाऱ्या बादशाह नगर परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटुन आले.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर जमावाकडून तुफान दगडफेक; महिलेची छेड काढल्याने उफळला वाद - surat bhusaval passanger
सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये हा सर्व प्रकार घडला.
या घटनेनंतर जमलेल्या संतप्त जमावाने लाठ्या-काठ्या घेत दगडफेक केली होती. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी दोन हॅन्ड ग्रेनेड, पाच गॅस सेलचा वापर केला आहे. या दगडफेकीच्या घटनेत एक रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे छेडछाड झालेल्या महिलेने अद्यापही तक्रार दिली नसुन सदर महिलेचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या वातावरण निवळले असुन परिसरात शांतता आहे. लोहमार्ग पोलिसांचे भुसावळ आणि औरंगाबाद येथून वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झाले असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.