महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stone Pelting In Shahada : शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल - संवेदनशील भागातून रुटमार्च काढला

Stone Pelting In Shahada : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले असून, या दंगलीप्रकरणी तीन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. यात 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Stone Pelting In Shahada
Stone Pelting In Shahada

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 11:28 AM IST

Updated : Oct 1, 2023, 11:49 AM IST

शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

नंदुरबार Stone Pelting In Shahada : शहादा शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या 3 फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात दोन गटाकडून वेगवेगळ्या तर पोलिसांनी देखील एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमारे 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील काहींना पोलिसांनी अटक केलीय. त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलीसांनी संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आमदार राजेश पाडवी यांनीही घटनास्थळी भेट देवून नागरीकांशी चर्चा केली. तसंच नागरिकांना शांततेचं व अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केलंय.

वेगवेगळ्या तीन फिर्याद दाखल : शहादा शहरात धार्मिक मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादाची पर्यावसान दगडफेकीत झाले. त्यानंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यात काही वाहनांचे व घरांचेदेखील नुकसान झाले होते. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एका गटानं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, संशयितांनी भवानी चौकात दगडफेक करुन वाहनांचं नुकसान केलं. तसंच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत काहींना जखमी केलं. याप्रकरणी एकुण 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातील 15 जणांना अटक करण्यात आली असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. बी .दुबे यांनी त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



महिलेच्या फिर्यादीवरुन 50 जणांविरुद्ध गुन्हा: दुसऱ्या गटाकडून एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, संशयितांनी घोषणाबाजी करत भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी.दुबे यांनी त्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


पोलिसांतर्फे गुन्हा दाखल : धार्मिक मिरवणुकीत दोन गटात वाद होऊन शहरातील शांतता भंग केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोलिसांतर्फेदेखील फिर्याद दाखल करण्यात आलीय. त्यात म्हटलंय की, दगडफेक करत वाहनांची तोडफोड करुन व घरांचं नुकसान करत जमावानं अशांतता निर्माण केली. तसंच कर्तव्यावर असणार्‍या पोलीसांना रोखण्याचा प्रयत्नदेखील संशयितांनी करून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलंय. याप्रकरणी 60 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय.

  • पोलिसांचं संवेदनशील भागातून रुटमार्च : शहादा शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळं जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहाद्यातील संवेदनशील भागातून रुटमार्च काढला. पथसंचलन करत नागरीकांनी अफवांना बळी पडू नये व शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलंय.

हेही वाचा :

  1. Stone Pelting In Shahada: शहाद्यात दोन गटात दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
  2. Stone Pelting In Shahada : शहाद्यात दोन गटात दगडफेक, 14 जण जखमी; वाहनांसह घरांचे व दुकानाचे नुकसान
  3. Gautami Patil Controversy : गौतमी पाटील उशिरा आल्यानं हुल्लडबाजांनी तोडल्या खुर्च्या; पोलिसांचा लाठीचार्ज, पहा व्हिडिओ
Last Updated : Oct 1, 2023, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details