नंदुरबार : शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दंगलीत काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. रात्री पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला असून जुन्या वादातून दोन गटात ही तुफान दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान
दंगलीत 2 अधिकाऱ्यांसह 2 ते 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी सुमारे पंधरा ते वीस संशयतांना अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री झाला दगडफेकीचा तांडव: मध्यरात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक दगडफेक सुरू झाली. या दरम्यान परिसरात बंदोबस्तात असलेले पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यादरम्यान जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. मात्र या दगडफेकीचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही आहे. त्यामुळे या दंगलीचे कारण गुलदस्त्यातच आहे.
अधिकारी व कर्मचारी जखमी : जुन्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. मोटर सायकलची जाळपोळ करण्यात आली आहे. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून धरपकड सुरू होती. जवळपास 15 ते 20 संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात पूर्ण शांतता आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.