महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID19: नंदुरबारमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी...

सबंध मानवजातीवर भयावह संकट बनून आलेल्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू फैलावत आहे. या कोरोनाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना करत आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

spraying-drug-in-every-village-to-prevent-corona-in-nandurbar
कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी...

By

Published : Mar 25, 2020, 10:57 AM IST

नंदुरबार- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात उपाययोजना सुरू केली आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करणे, अशा उपाय योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबतची माहिती दिली.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी...

हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

सबंध मानवजातीवर भयावह संकट बनून आलेल्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू फैलावत आहे. या कोरोनाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना करत आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तर जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने बंद करण्याची कार्यवाही केली आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी सुरू केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचीच अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, त्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा पध्दतीने खबरदारी घेतली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details