महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शान'ची सारंगखेड्यात शानदार एंट्री.. अनेकांना लावले वेड - शान घोडा

उंच धिप्पाड अशा 'शान' ला पाहिल्यावर तेथील उपस्थित त्याच्या प्रेमात पडतात. संपूर्ण काळ्या रंगाचा असलेल्या 'शान' या मारवाड जातीच्या घोड्याने सारंगखेड्यातील अश्वप्रेमींना वेड लावले आहे. येणारा प्रत्येकजण याच घोड्याच्या शोधात फिरत आहे.

shan horse
शान घोडा

By

Published : Dec 23, 2019, 2:39 PM IST

Updated : Dec 23, 2019, 5:29 PM IST

नंदुरबार- देशातील क्रमांक दोनचा घोडेबाजार असलेल्या सारंगखेड्यामधील बाजारात 'शान' नावाच्या घोड्याने सर्वात जास्त भाव खाल्ला आहे. मारवाड जातीचा हा घोडा या यात्रेत विक्रीसाठी नसून, तर फक्त सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आला आहे. खास पंजाबवरून हा घोडा येथे आला आहे.

'शान' घोड्याची सारंगखेड्यात रुबाबदार एंट्री

हेही वाचा - सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

उंच धिप्पाड अशा 'शान' ला पाहिल्यावर तेथील उपस्थित त्याच्या प्रेमात पडतात. संपूर्ण काळ्या रंगाचा असलेल्या 'शान' या मारवाड जातीच्या घोड्याने सारंगखेड्यातील अश्वप्रेमींना वेड लावले आहे. येणारा प्रत्येकजण याच घोड्याच्या शोधात फिरत आहे.

....म्हणून शान आहे लय खास-

शान हा मारवाड जातीचा आणि ब्लडलाईनचा घोडा आहे. आलिशान या घोड्याचा तो वंशज आहे. त्यामुळे त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. थेट पंजाबमधून हा 'शान' फक्त सारंगखेड्यातील अश्व यात्रेतील सौंदर्य स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. त्याची चाल आणि त्याच्या टापांचा असंग आणि मर्दानी आवाज हृदयाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही.

'शान' हा अवघ्या साडेपाच वर्षांचा घोडा आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेत शान हा हमखास विजयी झाला आहे. त्याने नुकताच पुष्करचा मेला गाजवला आहे. 'शान' हा विशेष घोडा असल्याने त्याला अन्य घोड्यांच्या आजारांची लागण होऊ नये यासाठी या यात्रेतील प्रत्येक घोड्याची रक्तचाचणी करण्यात आली हे विशेष...

'शान'चा ऐटदारपणा आणि रुबाब हा त्याला पाहताच समजतो. त्याला सांभाळणारे दोघे कामगार कायम त्याच्यासोबतच राहतात. त्याच्या आहार विहाराचे टाईमटेबल ठरलेले आहे. त्यामुळे सगळीकडे 'शान'चीच चर्चा सुरू आहे.

Last Updated : Dec 23, 2019, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details