नंदुरबार -जिल्ह्यातील नवापूर वनक्षेत्रात शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आज पहाटे या जंगलातून एक गावठी बंदूक, एक लोखंडी भाला जप्त करण्यात आला. मात्र, शिकाऱ्यांचा पाठलाग केला असता ते घटनास्थळावरून फरार झाले. आज पहाटे ५ ते सहा वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
नवापूर जंगलातून बंदुकीसह भाला जप्त; शिकाऱ्यांचा जंगलात धुमाकूळ - nandurbar latest news
नवापूर तालुक्यातील भवरे जंगलात पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास वन विभागाचे वनपाल प्रकाश मावची, वनरक्षक नितीन पाटील हे जंगलात गस्त घालत होते. यावेळी तीन ते चार शिकारी आढळून आले. त्यांचा शिकारीचा हेतू असल्याचे समजताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
नवापूर तालुक्यातील भवरे जंगलात पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास वन विभागाचे वनपाल प्रकाश मावची, वनरक्षक नितीन पाटील हे जंगलात गस्त घालत होते. यावेळी तीन ते चार शिकारी आढळून आले. त्यांचा शिकारीचा हेतू असल्याचे समजताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी सिंगलबार बंदूक, एक लोखंडी भाला, असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधितांवर वन्यजीव कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. उपवनसंरक्षक सुरेश कवटे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
नवापूर तालुक्यातील जंगलात रानडुकर, मोर अश्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी पहाटे व रात्री जात असतात. यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी यांनी परिसराची कसून चौकशी करून वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना कडक शासन करावे, अशा मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.