महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने ठेवली बंद

व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

By

Published : Apr 29, 2019, 1:31 PM IST

नंदुरबार- मतदान न करण्यासाठी काहीजण कारणे शोधत असतात. अशा स्थितीत नवापूर तालुक्याच्या विसरवाडीतील व्यावसायिकांनी मतदान करण्याचा प्रत्यक्ष कृतीतून चांगला संदेश दिला आहे. या व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुकाने बंद ठेवली आहेत.


चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विसरवाडी परिसरातील व्यवसायिकांनी आपली दुकानं बंदे ठेवली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.

व्यावसायिकांनी दुकाने ठेवली बंद
विशेष म्हणजे विसरवाडी परिसर ही मोठी बाजारपेठ असल्याने जवळपास ४५ खेड्यापाड्यातील लोक खरेदीसाठी येत असतात. विसरवाडीतील दुकाने बंद असल्याने परिसरातील खेड्यातील लोकांनीही आपला मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात बजावला. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details