नंदुरबार - विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीचे 115 मते फुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यात काँग्रेसचा एकही नेता प्रामाणिक नव्हता, असा आरोप करत काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. तसेच काँग्रेसची मते फुटल्याचा दावाही रघुवंशी यांनी केला.
महाविकास आघाडीकडे होती सर्वाधिक मते -
धुळे-नंदुरबार विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक 212 मते महाआघाडीकडे होती. तर 22 मते अपक्षांकडे होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय निश्चित होता, असेही ते म्हणाले. तर भाजपकडे एकूण 203 मते होती. भाजपने अपक्ष 22 मतांवर आपला दावा असल्याचे सांगितले होते. त्यावरून अमरीश पटेल विजय होतील, असा दावा व्यक्त केला होता.
हेही वाचा -विधानपरिषद रणधुमाळी : धुळ्यातून भाजपचे अमरिश पटेल विजयी; पाहा LIVE अपडेट्स..