नंदुरबार -दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रावरील त्रिवेणी संगमावर महापुराण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यात सूर्यकन्या तापीमाईला सुमारे अर्धा किमी लांबीचे महावस्त्र राष्ट्रसंत कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे शेकडो जण साक्षीदार बनले. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रावरील संगमेश्वर, केदारेश्वर, सिद्धेश्वर, महादेव या मंदिरांची सर्वदूर ख्याती आहे.
प्रकाशा येथे शनिवारपासून शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. शिवपुराण कथेचे निरुपण करणार्या राष्ट्रसंत कनकेश्वरी देवी यांची तापीमाईला महावस्त्र अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार गंगाखेड येथून 550 मीटर अर्थात अर्ध्या किमीचे अखंड गुलाबी रंगाचे महावस्त्र मागविण्यात आले. गोमाई, फुलंदा, तापी नदीच्या त्रिवेणी संगमावर प्रथमच तापीमाईला विधिवत पूजन करून दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रसंत कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते महावस्त्र अर्पण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार बनले. महावस्त्र अर्पण करताना परिसरात जल्लोषमय व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा - तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, 975 विद्यार्थ्यांचा सहभाग